GODREJ MAGIC ने हँडवॉशच्या नवीन टीव्हीसीसाठी ब्रँड अम्बेसेडर  म्हणून केली माधुरी दीक्षितची निवड

GODREJ MAGIC ने हँडवॉशच्या नवीन टीव्हीसीसाठी ब्रँड अम्बेसेडर  म्हणून केली माधुरी दीक्षितची निवड

गोदरेज मॅजिकने हँडवॉशच्या नवीन टीव्हीसीसाठी ब्रँड अम्बेसेडर 
म्हणून केली माधुरी दीक्षितची निवड !

* प्रतिनिधि

           मुंबई : गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (GCPL)चा वैयक्तिक आणि घरगुती स्वच्छता ब्रँड असलेल्या गोदरेज मॅजिकने अभिनेत्री माधुरी दीक्षितला त्यांच्या गोदरेज मॅजिक हँडवॉश पावडर-टू-लिक्विड हँडवॉशसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषित केले. ब्रँडने क्रिएटिव्हलँड एशिया द्वारे संकल्पित एक नवीन टीव्हीसी देखील सादर केली असून त्यामध्ये माधुरी या शाश्वत व्यवहार्य स्वच्छता उत्पादनाची वैशिष्ट्ये सादर करताना दिसते. 

    बॉलीवूडवर अनेक वर्षे अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री माधुरी दीक्षितचा प्रचंड मोठा आणि निष्ठावंत चाहतावर्ग आहे. हे चाहते तिच्याकडे विविध पैलूंतून बघतात. सध्या काम सुरू  असलेल्या एका नवीन चित्रपटासह एका लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो मधील उपस्थिती आणि ओटीटी माध्यमातील पदार्पणातच मिळालेले भरघोस यश यामुळे माधुरीची लोकप्रियता विविध वयोगटांमध्ये आणि भौगोलिक क्षेत्रांमध्ये पसरली आहे. या सहयोगाचा उद्देश लोकांना हात धुण्याच्या गोष्टीला प्राधान्य देण्यासाठी आणि शाश्वत निवडी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी माधुरीबद्दल कालातीत वाढणारी ओढ आणि गोदरेज मॅजिकची ब्रँड मूल्ये एकत्र आणणे हा आहे. 

    या सहयोगाबद्दल बोलताना गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडच्या मुख्य विपणन अधिकारी सोमश्री बोस म्हणाल्या, "गोदरेज मॅजिक हँडवॉश हे अशा प्रकारचे पहिले उत्पादन आहे जे स्वच्छतेच्या श्रेणीत नावीन्य आणि टिकाऊपणामध्ये झेप घेणारे आहे. या उत्पादनाने स्वच्छ जीवनशैली सोपी, परवडणारी आणि मजेदार केली आहे. गोदरेज मॅजिकने आधीच भारतीय हँडवॉश बाजारपेठेचा १/५ भाग व्यापला आहे. इथून पुढच्या प्रवासासाठी माधुरी दीक्षितला मॅजिक ब्रँडमध्ये सामावून घेतल्याने आम्हाला आनंद होत आहे. माधुरीसोबतच्या या ब्रँडच्या सहयोगामुळे भारतीय बाजारपेठेत खोलवर शिरायला आणि जंतुविरहीत भारताचा प्रसार करायला आम्हाला मदत होईल."

    या सहयोगाविषयी बोलताना माधुरी दीक्षित म्हणाली, "भारतातील पहिला पावडर टू लिक्विड हँडवॉश असणाऱ्या आणि या श्रेणीतील अग्रणी अशा गोदरेज मॅजिक हँडवॉशशी जोडले जाण्याचा मला खूप आनंद झाला आहे.  हाताची स्वच्छता आणि आरोग्य यावर भर देणाऱ्या सामाजिक प्रश्नांसाठी उपाय असलेल्या या हँडवॉशचे स्वरूप नाविन्यपूर्ण असून हा एक परवडणारा उपाय आहे. यामध्ये प्लास्टिक आणि इंधनाचा वापर कमी होत असल्याने मॅजिक हँडवॉश हे पर्यावरणपूरक उत्पादन आहे.

    “मी स्वत: स्वच्छतेबद्दल विशेष आग्रही असते आणि माझ्या कुटुंबासह त्याचे काटेकोरपणे पालन करते. हात धुणे आणि दात घासणे या दोन स्वच्छतेसंदर्भातील गोष्टी माझ्या मुलांनीही नेहमी काटेकोरपणे करण्याचा आग्रह मी करत असते. मी गोदरेजच्या टीमसह लोकांना केवळ जंतूंपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नव्हे तर एक पाऊल पुढे शाश्वततेच्या दिशेने टाकत पर्यावरणपूरक उत्पादने वापरण्याबाबत जागरूकता निर्माण करण्यास प्रेरित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे."

गोदरेज मॅजिक हँडवॉश कडुनिंब आणि कोरफड यांनी समृद्ध आहे. त्यामुळे ते हातांना सौम्य परंतु जंतूंसाठी नाशक बनते. हे सिंगल पावडर सॅशेमध्ये आणि मॅजिक रिकामी बाटली आणि पावडर सॅशेच्या कॉम्बी पॅकमध्ये देखील उपलब्ध आहे. पावडर सॅशेची किंमत १५ रुपये आहे. सध्याच्या लिक्विड हँडवॉश रिफिलच्या किंमतीच्या ती एक तृतीयांश आहे. कॉम्बी पॅकची किंमत ३५ रुपये आहे. सध्याच्या लिक्विड हँडवॉश बॉटल पॅकच्या किंमतीपेक्षा ही किंमत निम्म्याहून कमी आहे. तर मग सुरक्षित राहण्यासाठी ही पावडर एकत्र करा, हलवा आणि हात धुवा.

    पावडर-टू-लिक्विड स्वरूप गोदरेज मॅजिक हँडवॉशला पर्यावरणपूरकही बनवते. मॅजिक हँडवॉशला नेहमीच्या हँडवॉशच्या तुलनेत पॅकेजिंगमध्ये फक्त १/२ प्लास्टिक आवश्यक असते. पावडर सॅशे लहान आणि हलके असल्यामुळे एका ट्रकमधून अधिक सॅशेची वाहतूक केली जाऊ शकते. त्यामुळे  केवळ १/४ इंधनाचा वापर होतो ज्यामुळे नियमित हँडवॉशच्या वाहतुकीच्या तुलनेत कार्बन उत्सर्जन कमी होते.  सॅशे हलके असल्यामुळे प्रत्येक ट्रकमधून चार पट अधिक रिफिल वाहतूक केली जाऊ शकते.