वडाळ्याच्या अक्षय कदम यांचा हॉटसीटपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास !

वडाळ्याच्या अक्षय कदम यांचा हॉटसीटपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास !

वडाळ्याच्या अक्षय कदम यांचा हॉटसीटपर्यंतचा प्रेरणादायी प्रवास !

पाहा, 'कोण होणार करोडपती', सोमवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.

 * प्रतिनिधि

      'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातले स्पर्धक सहभागी होत असतात. कोणी डॉक्टर, कोणी पोलीस उपनिरीक्षक तर कोणी वकील. अशा वैविध्यपूर्ण स्पर्धकांमुळे 'कोण होणार करोडपती'चा खेळ अधिक रंगतदार होतो. कितीही हलाखीची परिस्थिती असली तरी न डगमगता आलेल्या संकटांना सामोरे जाणारे काही धैर्यवान स्पर्धकही या कार्यक्रमात सहभागी होत असतात.  या आठवड्यात सोमवारच्या भागात असेच एक स्पर्धक सहभागी होणार आहेत. वडाळा  येथे राहणारे लेखक असणारे अक्षय कदम सहभागी होणार आहेत. मध्यमवर्गीय घरातले अक्षय कदम घरच्यांच्या सुखासाठी आणि व्यवसाय सुरु करण्याच्या उद्देशाने या खेळात सहभागी झाले आहेत.

आईवडीलांनी केलेल्या कष्टांची जाणीव असणारे संवेदनशील स्पर्धक अक्षय कदम हे सध्या कंटेट रायटर  म्हणून काम करत आहे. त्यांच्या घरी तो, त्याचे आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. अक्षयची आई दुसऱ्यांच्या घरी घरकाम करते, वडील  प्रिंटिंग प्रेस मध्ये कामाला होते पण करोनापासून त्यांचं काम बंद आहे. अक्षय यांची बहीण  नायर हॉस्पिटल मध्ये डायलिसिस टेक्निशियन (dialysis technician) म्हणून काम करते. शिक्षण घेता घेता अक्षयने आईस्क्रिम च्या दुकानात काम करत कष्ट करून पैसे मिळवण्यास सुरुवात केली. अक्षय कामाला लागल्यापासून त्याने आईला काम सोडून द्यायला संगितले होते पण आईची सवय आहे काम करण्याची म्हणून तिने अजून काम सोडलेले नाही. आईने खूप कष्ट केले आहेत आणि याची जाणीव असल्याने अक्षयला आता तिला आराम द्यायचा आहे.अक्षयचं हे स्वप्न आहे की त्याला त्याची स्वतःची टूर कंपनी सुरु करायची आहे ज्यात तो लोकांना चांगल्या ठिकाणी कमीत कमी खर्चामध्ये घेऊन जाईल. त्याचबरोबर त्याचं अजून एक स्वप्न आहे की  त्याला आईस्क्रीमचं दुकान सुरु करायचं आहे. आईस्क्रीमच्या दुकानात अक्षयने काम केल्यामुळे तिकडचा अनुभव त्याच्याजवळ आहे. मध्यमवर्गीय अक्षय २५ लाख रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचला असून  अक्षयचे करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.  

- पाहा, 'कोण होणार करोडपती', सोमवारी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.