एकाच वेळी सहा भाषांत प्रदर्शित होणार दीपक राणेंचा सिनेमा 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' !

एकाच वेळी सहा भाषांत प्रदर्शित होणार दीपक राणेंचा सिनेमा 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' !

मराठी निर्मात्याचे सिमोल्लंघन....

एकाच वेळी सहा भाषांत प्रदर्शित होणार दीपक राणेंचा सिनेमा 'आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे' !

* प्रतिनिधि

       मराठी सिनेमाने ग्लोबल विचार करायला हवा असं आपण नेहमी म्हणतो.  त्यासाठी तो मराठी सिनेमा मराठी भाषिकांपुरता मर्यादीत न राहाता,  देशभरात वेगवेगळ्या भाषेतल्या प्रेक्षकांपर्यंत पोहचला पाहिजे. हाच विचार घेऊन निर्माते दीपक पांडुरंग राणे आपला आगामी मराठी सिनेमा पॅन इंडिया प्रदर्शित करणार आहेत. दीपर राणे यांनी आत्तापर्यंत दुनियादारी, तु ही रे, ७२ मैल,लकी, खारी बिस्कीट, दगडी चाळ असे वेगवेगळ्या विषयाचे सिनेमा आणले आहेत. त्यानंतर आता आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा एक एक्शन सिनेमा घेऊन आले आहेत.

   या सिनेमाचे टायटल रिलीज नुकतेच करण्यात आले. आफ्टर ऑपरेशन लंडन कॅफे हा सिनेमा मराठी – कन्नड भाषेत चित्रीत झाला आहे. त्याशिवाय हिंदी, तमिळ, तेलगुस मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.या सिनेमाच्या पोस्टरला सोशल मिडीयावर चांगला प्रतिसाद मिळाला.

आपला मराठी सिनेमा सीमा ओलांडतो आहे या बद्दल प्रेक्षकांनी कौतुक केले आहे. या बद्दल निर्माते दीपक पांडुरंग राणे म्हणतात,  " दाक्षिणात्य प्रादेशिक सिनेमांनी त्यांच्या सीमा कधीच ओलांडल्या आहेत. मराठी सिनेमाही  आपल्या सीमा ओलांडू शकतो. मराठी सिनेमा विषयी कुतुहल आणि कौतुक सर्वच सिनेसृष्टीत आहे. नवनवीन विषय हाताळण्यात मराठी सिनेमा कुठेच मागे नाही. त्यामुळेच आपणही आपला सिनेमा वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित केले पाहिजेत. त्यामुळे मराठी सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल.”

 या सिनेमात  कन्नड स्टार कवीश शेट्टी, मेघा शेट्टी, मराठीतील स्टार कलाकार शिवानी सुर्वे आणि विराट मडके यांच्या मुख्य भूमिका आहे. सदागरा राघवेंद्र यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. दीपक राणेंसोबत या सिनेमाची निर्मीती विजय कुमार शेट्टी यांनी केले आहेत.