'गडद अंधार' चित्रपटातील 'दरिया, दरिया...' हे गाणं प्रदर्शित...

'गडद अंधार' चित्रपटातील 'दरिया, दरिया...' हे गाणं प्रदर्शित...

'गडद अंधार' चित्रपटातील 'दरिया, दरिया...' हे गाणं प्रदर्शित...

* सिने प्रतिनिधि

    मराठीत पहिल्यांदाच एक वेगळा प्रयोग करण्यात येत असल्याने 'गडद अंधार' हा आगामी मराठी चित्रपट मागील बऱ्याच दिवसांपासून लाईमलाईटमध्ये आहे. या चित्रपटाची उत्सुकता टिझर रिलीज झाल्यापासून वाढली आहे. आता या चित्रपटातील नवं कोरं धमाकेदार गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. 'गडद अंधार'मधील 'दरिया, दरिया...' हे गाणं नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून रिलीज करण्यात आलं आहे. टेक्निकली खूप दर्जेदार असलेल्या या सुमधूर गीतावर अल्पावधीत लाईक्सचा वर्षाव होत आहे. एका अनोख्या विश्वाची सफर घडवणाऱ्या 'गडद अंधार' चित्रपटाची झलक 'दरिया, दरिया...' या गाण्यात पहायला मिळते.

     इलुला फिचर व्हिजन प्रा. लि.च्या बॅनरखाली निर्माते कॅप्टन अवधेश सिंग आणि वर्षा सिंग यांनी 'गडद अंधार' या चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शक प्रज्ञेश रमेश कदम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 'दरिया, दरिया...' हे गाणं गीतकार अभिषेक खणकर यांनी लिहिलं असून, गायक-संगीतकार रोहित श्याम राऊतनं स्वत:च गायलं आणि संगीतबद्धही केलं आहे. 'मुजोर मना रे, तू सोड किनारे, हरवलेल्या सुरांना तू शोध पुन्हा रे...' हा 'दरिया, दरिया...' या गाण्याचा मुखडा खूप काही सांगणारा आहे. शफी शेख यांनी या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे. झी म्युझिक मराठीवर हे गाणं अव्हेलेबल आहे. निळाशार समुद्र, हिरवागार समुद्रकिनारा, नारळी-फोफळीच्या बागा, अफलातून एरिअल कॅमेरावर्क आणि पाण्याखालच्या विश्वाची झलक या गाण्यात अगदी अचूकणे सादर करण्यात आली आहे. अनुप साटम यांनी या गाण्यात केलेलं अप्रतिम गिटार वादन मनाला भिडते. टिझरप्रमाणे 'गडद अंधार'मधील 'दर्या...' हे गाणंही प्रेक्षकांना एका अनोख्या सफरीवर घेऊन जाणारं आहे. अर्थपूर्ण शब्दरचना आणि समधूर संगीतरचनेला अचूक न्याय देण्याचं काम रोहितच्या आवाजानं केलं आहे. याबाबत रोहित म्हणाला की, 'दरिया, दरिया...' हे गाणं चित्रपटाच्या कथानकामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारं आहे. कथानकाच्या प्रवाहाशी एकरूप होणारं हे गीत उत्साह वाढवणारं आहे. याला वेस्टर्न म्युझिकचा टच देत सादर करण्याचा प्रयत्न केला आहे. दिग्दर्शक प्रज्ञेश कदम यांनी जेव्हा कथानकातील या सिच्युएशनसाठी गाणं करण्यास सांगितलं तेव्हा एनर्जीनं परिपूर्ण असलेलं हे गाणं बनवण्याची संधी मिळाली. तरुणाईसोबतच सर्व वयोगटातील संगीतप्रेमींना 'दरिया, दरिया...' हे गाणं नक्कीच आवडेल.

सुमधूर गीत-संगीताच्या जोडीला दमदार स्टारकास्ट ही 'गडद अंधार' चित्रपटाची जमेची बाजू आहे. यात 'एमटिव्ही स्प्लिट्सव्हीला एक्स ३'चा विजेता तसंच 'बिग बॅास' फेम जय दुधाणे मुख्य भूमिकेत असून, त्याच्या साथीला अभिनेत्री नेहा महाजन आहे. याखेरीज शुभांगी तांबाळे, आकाश कुंभार आदी कलाकारांच्याही विविध भूमिका आहेत. प्रज्ञेश कदम यांनी लौकिक आणि चेतन मुळे यांच्या साथीनं चित्रपटाचं लेखन केलं आहे. झिटारवादन भगिरथ भट यांनी केलं असून, जुईली जोगळेकर राऊत आणि आदिनाथ पाटकर यांनी बॅकिंग व्होकल्स दिले आहेत. या चित्रपटातील गाण्यांच्या रेकॉर्डिंग आणि मास्टरचे काम विनायक पवार यांनी साऊंडआयडियाज स्टुडिओजमध्ये केलं आहे. आदिनाथ पातकर यांनी गाण्याची व्यवस्था केली असून, या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते प्रवीण वानखेडे आहेत. सुपर नॅचरल थ्रीलर 'गडद अंधार' ३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.