'अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपट ठरला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिला मराठी चित्रपट

'अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपट ठरला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिला मराठी चित्रपट

'अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपट ठरला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिला मराठी चित्रपट

_ मराठी चित्रपटसृष्टीने केलं कलाकारांचं कौतुक

* सिने प्रतिनिधि

   प्रेम कहाणी सोबतच आदमखोरी दुनियेतील एका भयानक गुन्ह्याचा उलगडा करून देणार या चित्रपटाचं कथानक आहे. तसेच रत्नागिरी सुपुत्र फैरोज माजगांवकर ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटातून मराठी चित्रपट सिनेसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या पदार्पणाच्या चित्रपटाचे मोशन पोस्टर चक्क ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर प्रदर्शित करण्यात आल. शिवाय ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ या चित्रपटाला ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर झळकणारा पहिल्या मराठी चित्रपटाचा मान मिळाला. हास्यजत्रा फेम अभिनेता अरुण कदम, संजय खापरे, सुरेश विश्वकर्मा, अभिजित चव्हाण, अभिनेता आणि निर्माता फैरोज माजगावकर, अभिनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट असून अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. शिवाय अदिन माजगांवकर आणि अली माजगांवकर हे बालकलाकार देखील आहेत. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे आहेत. येत्या ७ जूनला हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होईल.”

   गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एलएलपी, प्रस्तुतकर्ते एम आर जोकर एंटरटेनमेंट एल एल पी सोबत सहयोगी अनिल एन वहाने फिल्म्स प्रोडक्शन्स आणि कियान फिल्म्स & एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचे श्री.फैरोज अनवर माजगावकर, श्री.अमजद हुसैन निराळे, श्री.श्रीकांत सिंह आणि सह निर्माते म्हणून श्री.अनिल वहाने आणि श्री.सुनील यादव ‘अ व्हॅलेंटाईन्स डे' या चित्रपटाचे निर्माते आहेत. साई पियुष,ऍलेन के पी ऊर्फ सिद्धार्थ पवार आणि निरंजन पेडगावकर हे संगीत दिग्दर्शक आहे. तसेच ‘ब्लू लाइन म्यूजिक’ ही म्युझिक पार्टनर कंपनी आहे.

   ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’विषयी बातचीत करताना अभिनेता आणि निर्माता फैरोज माजगांवकर म्हणाला, “‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ हा माझा पहिलाच चित्रपट आहे. मला सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आपला मराठी चित्रपट आज न्यूयॉर्कपर्यंत पोहोचला आहे. माझ्यासाठी व सर्व मराठी चित्रपटसृष्टी करिता ही अभिमानाची गोष्ट आहे. मी याच सर्व श्रेय या चित्रपटाच्या टीमला देतो. तसेच प्रेक्षकांना विनंती करतो की सर्वांनी हा चित्रपट ७ जूनला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात पाहा. आणि तुमच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवा.”

   चित्रपटाचे दिग्दर्शक रोहितराव नरसिंगे सांगतात, “मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच माझ्या आगामी चित्रपटाचं मोशन पोस्टर ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर प्रदर्शित झाल ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे.  ‘न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअर’वर माझ्या चित्रपटाचं मोशन पोस्टर झळकलं, त्यामुळे माझ्यात वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे की हा चित्रपट लोकांच्या मनावर राज्य करेल. आणि लोकांच्या पसंतीस पडेल. ही अपेक्षा मी व्यक्त करतोय. विशेष म्हणजे या चित्रपटाचं नाव जरी प्रेमावर आधारित असलं तरी यामागे दडलेलं भयानक कृत्य आहे ते तुम्हाला चित्रपटगृहातच पाहायला मिळेल. माझी रसिक प्रेक्षकांना एकच विनंती आहे की या चित्रपटातील टीज़र आणि गाण्यांना तुम्ही जो प्रतिसाद दिलात तोच प्रतिसाद ७ जूनला चित्रपट प्रदर्शित झाल्यावर नक्की द्याल. आणि आपला मराठी चित्रपट यशाच्या शिखरावर घेवून जाल.”