'दगडीचाळ २' मध्ये 'शकिल' आणि 'डॅडी' मध्ये रंगणार नव राजकारण...

 'दगडीचाळ २' मध्ये 'शकिल' आणि 'डॅडी' मध्ये रंगणार नव राजकारण...

डॅडी' वर्सेस 'शकिल' .....
 'दगडीचाळ २' मध्ये 'शकिल' आणि 'डॅडी' मध्ये रंगणार नव राजकारण...

* प्रतिनिधि

       मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता अहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित 'दगडी चाळ २' ह्या चित्रपटात 'सूर्या' ,'डॅडी' ,'सोनल' यांच्या कहाणीतला नवीन इक्का म्हणजे 'शकील'. 'सूर्या' आणि 'डॅडी' या दोघांच्या वादात आता 'शकील' कहाणीला काय नवीन वळण आणतोय ते चित्रपट पाहिल्यावरच कळेल. म्हणतात ना वैऱ्याचा वैरी म्हणजे मित्र हीच डोकॅलिटी वापरून 'शकील'ने मारलेली कमाल एन्ट्री प्रेक्षकांची उत्सुकता अजून वाढवत आहे. 'डॅडी' ची ऑफर सूर्या स्वीकारतो की शकील सोबत हात मिळवतो हे गुपित अजून गुलदस्त्यातच आहे. शकील ने दिलेली ऑफर सूर्या स्वीकारेल का? ह्याचे उत्तर येत्या १९ अॅागस्टला चित्रपट पाहिल्यावरच कळणार.  'डॅडी' वर्सेस 'शकील' यांचे वैर चित्रपटाला वेगळाच तडका लावणार असा वाटत आहे. ह्या चित्रपटात अंकुश चौधरी (सूर्या), पूजा सावंत (सोनल), मकरंद देशपांडे (डॅडींच्या )भूमिकेत असून   (शकील) च्या भूमिकेत अशोक समर्थ आहेत.

     दहशद,गॅंगवॉर,राजकारण ,ऍक्शन आणि लव्हस्टोरी पुन्हा एकदा 'दगडीचाळ २' मध्ये  आपल्याला पाहायला मिळणार. 
   निर्मात्या संगीता अहिर म्हणतात," यंदा दगडी चाळ २ चित्रपटात गॅंगवॅारसोबत राजकारणातील ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत आणि ते ट्विस्ट प्रेक्षकांना आवडतील ही आशा आहे. हा चित्रपट एकाच वेळी वर्ल्डवाइड प्रदर्शित होणार आहे.''