'अनुबोध' व 'नवचैतन्य प्रतिष्ठान' प्रस्तुत 'स्वरसंचित - दिवाळी पहाट'

'अनुबोध' व 'नवचैतन्य प्रतिष्ठान' प्रस्तुत 'स्वरसंचित - दिवाळी पहाट'

'अनुबोध' व 'नवचैतन्य प्रतिष्ठान' प्रस्तुत 'स्वरसंचित - दिवाळी पहाट' .....

-गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, किशोरी आमोणकर, सुधिर फडके, सुमन कल्याणपूर यांसारख्या जेष्ठ गायकांनी गायलेल्या गाण्यांचे 'स्वरसंचित' या कार्यक्रमात रसिकांना अनुभवायला मिळणार.......

* अमित मिश्रा

        'अनुबोध' व 'नवचैतन्य प्रतिष्ठानच्या' संयुक्त विद्यमाने यंदाही बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात बुधवार, दि. १५ नोव्हेंबर २०२३ रोजी भाबीऊजेचे औचित्य साधून पहाटे ६.३० वा. 'दिवाळी पहाट स्वरसंचित' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

  मराठीतील प्रतिभावंत, नामवंत गायकांच्या गाण्यांचा आस्वाद या कार्यक्रमात तमाम रसिकांना घेता येईल. सध्याचे आघाडीचे गायक विश्वजीत बोरवणकर, शरयू दाते, मयुर सुकाळे हे या सर्व प्रतिभावंतांची गाणी आपल्या पुढे सादर करणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना आणि संगीत संयोजन सुप्रसिध्द संगीतकार संगीत संयोजक कमलेश भडकमकर यांचे असून, आपल्या खुसखुशीत - खुमासदार शैलीत निवेदन सादर करणार आहेत.

       गानसम्राज्ञी लता मंगेशकर, आशा भोसले, हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, किशोरी आमोणकर, सुधिर फडके, सुमन कल्याणपूर, गजानन वाटवे, माणिक वर्मा, जयवंत कुलकर्णी, मयुरेश साने या व अशा जेष्ठ गायकांच्या गाण्यांच हे 'स्वरसंचित' ऐकण्यासाठी तमाम बोरीवलीकर रसिकांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजक, भूषण पाटील, सुबोध खेर, अनुप चलकरण, मनोज नायर, अनिल परब यांनी केले आहे.