'खुपते तिथे गुप्ते' च्या दुसऱ्या भागात हजेरी लावणार कोण ?

'खुपते तिथे गुप्ते' च्या दुसऱ्या भागात हजेरी लावणार कोण ?

'खुपते तिथे गुप्ते' च्या दुसऱ्या भागात हजेरी लावणार कोण ?

_धारदार प्रश्न , खुमासदार गप्पा आणि अभिनेता श्रेयस तळपदे !

 * सिने प्रतिनिधि

        झी मराठीवरील "खुपते तिथे गुप्ते" हा कार्यक्रम पहिल्याच भागात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ह्या कार्यक्रमात तिसऱ्या पर्वाच्या पहिल्या एपिसोडमध्ये राजसाहेब ठाकरे ह्यांनी हजेरी लावली, आणि प्रेक्षकांनी भरभरून प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव केला.

    आता दुसऱ्या भागात ही प्रेक्षकांना बसणार आहेत धक्क्यावर धक्के कारण 'खुपते तिथे गुप्ते' च्या मंचावर दिसणार आहेत महाराष्ट्राचा प्रचंड आवडता माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून  पुन्हा एकदा घराघरात पोहोचलेला अभिनेता श्रेयस तळपदे.  

   झी मराठीने नुकताच एक प्रोमो आपल्या सोशलमीडिया पेज वर शेअर केला यात गुप्तेंच्या  धारदार  प्रश्नांना तो  अतिशय भावनिक उत्तर देतोय हे पाहायला मिळते आहे. आता अजून या भागातून  काय काय गुपित बाहेर पडणार आहेत, यासाठी पाहायला विसरू नका ‘खुपते तिथे गुप्ते’ रविवार ११ जून रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.