‘समायरा’ उलगडणार एका असाधारण प्रवासाची गोष्ट

‘समायरा’ उलगडणार एका असाधारण प्रवासाची गोष्ट

‘समायरा’ उलगडणार एका असाधारण प्रवासाची गोष्ट
_२६ ऑगस्टला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

* प्रतिनिधी

         ऋषी श्रीकृष्ण देशपांडे दिग्दर्शित 'समायरा' या चित्रपटाची नुकतीच सोशल मीडियावर घोषणा करण्यात आली असून येत्या २६ ऑगस्ट रोजी ‘समायरा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टर मध्ये केतकी नारायण अव्हेंजर चालवताना दिसत असून तिच्या चेहऱ्यावर एक ध्येय साध्य करण्याचा आत्मविश्वास दिसत आहे. तिच्या ध्येयापर्यंतचा हा असाधारण प्रवास आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

    ‘समायरा’चे दिग्दर्शक ऋषी देशपांडे म्हणतात " प्रत्येक जण आयुष्य जगण्यासाठी एक प्रवास करत असतो. तसाच एक असाधारण प्रवास ‘समायरा’चाही असणार आहे. तिचा हा प्रवास तिचे ध्येय साध्य करणार का, हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे. सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन विषय हाताळले जात आहेत. ही कथाही खूप वेगळी आहे. ‘समायरा’चा हा प्रवास प्रेक्षकांना नक्कीच सकारात्मकता देईल."

    ग्लोबल सेवा एलएलपी प्रस्तुत, अद्योत फिल्म्सच्या सहयोगाने, या चित्रपटाची निर्मिती डॉ. जगन्नाथ सुरपूरे, रतन सुरपूरे, शशिकांत पनत, योगेश आळंदकर आणि ऋषी श्रीकृष्ण देशपांडे यांनी केली असून या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सुमित विलास तांबे यांचे आहेत.