१७ जुलैला प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार ‘बळी’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

१७ जुलैला प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार ‘बळी’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

१७ जुलैला प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार ‘बळी’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

* प्रतिनिधी 

 

     पावनखिंड, झिम्मा,कारखानीसांची वारी आणि स्टेपनी यासारख्या सुपरहिट सिनेमांनंतर प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळणार आहे हॉरर थ्रीलर ‘बळी’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर. प्रवाह पिक्चरवर दाखवण्यात आलेल्या पावनखिंड आणि झिम्मा या दोन्ही सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. पावनखिंड सिनेमा मराठी चित्रपट वाहिनीवरचा सर्वात मोठा चित्रपट ठरला असून झिम्मा देखिल सर्वाधिक रेट करणाऱ्या ३ प्रीमियर मधील एक प्रीमियर ठरला आहे. पदार्पणातच प्रवाह पिक्चर वाहिनीला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. सुपरहिट सिनेमांची मेजवानी देत प्रेक्षकांचा रविवार खास बनवणाऱ्या प्रवाह पिक्चरवर येत्या रविवारी बळी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

     बळी हा हॉरर थ्रीलर सिनेमा असून स्वप्नील जोशी आणि पूजा सावंत या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. ७ वर्षांचा मुलगा मंदारच्या वडिलांच्या भूमिकेत स्वप्नील जोशी दिसणार असून मंदारच्या उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये घडणाऱ्या अनेक रहस्ममय घटना या सिनेमाची उत्कंठा वाढवतात. दिग्दर्शक विशाल फ्युरिया यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून जिसिम्स या निर्मिती संस्थेने या सिनेमाची निर्मिती केली आहे.

तेव्हा पाहायला विसरु नका हॉरर थ्रीलर बळी सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या रविवारी म्हणजेच १७ जुलैला दुपारी १ वाजता फक्त प्रवाह पिक्चरवर.