२४ जुलैला प्रवाह पिक्चरवर पाहा ‘मन फकिरा’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

२४ जुलैला प्रवाह पिक्चरवर पाहा ‘मन फकिरा’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

२४ जुलैला प्रवाह पिक्चरवर पाहा ‘मन फकिरा’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

_अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने व्हिडिओ पोस्ट करत केलं सिनेमा पहाण्याचं आवाहन 

* प्रतिनिधि

     अभिनेत्री मृण्मयी देशपांडेला आपण अभिनेत्री म्हणून तर ओळखतोच पण मन फकिरा या सिनेमाद्वारे तिने दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल टाकलंय. मृण्मयीचा पहिला वहिला दिग्दर्शित सिनेमा  ‘मन फकिरा’चा येत्या रविवारी म्हणजेच २४ जुलैला प्रवाह पिक्चरवर वर्ल्ड टेलिव्हिजन होणार आहे. कोरोनाच्या संकटकाळात हा सिनेमा रिलीज झाला आणि लॉकडाऊनमुळे तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचला नाही. गेल्या कित्येक दिवसांपासून हा सिनेमा कुठे पहायला मिळेल अशी मृण्मयीकडे विचारणा होत होती. त्यामुळे मृण्मयीने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत मन फकिरा २४ जुलैला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चरवर पहाण्याचं आवाहन केलं आहे.

    मन फकिरा मध्ये सुव्रत जोशी, सायली संजीव, अंकीत मोहन, अंजली पाटील प्रमुख भूमिकेत असून प्रेमाची नवी व्याख्या सिनेमातून उलगडेल. प्रवाह पिक्चरवर दर रविवारी नव्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन दाखवण्यात येतो. पावनखिंड, झिम्मा, कारखानिसांची वारी, स्टेपनी आणि बळी या सिनेमांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. तेव्हा पाहायला विसरु नका मन फकिरा सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २४ जुलैला दुपारी १ वाजता फक्त प्रवाह पिक्चरवर.