गुरु प्रॉडकशन्स च्या ' दिल धक धक करे' या धमाल विनोदी नाटकाचा शुभ-मुहूर्त

गुरु प्रॉडकशन्स च्या ' दिल धक धक करे' या धमाल विनोदी नाटकाचा शुभ-मुहूर्त

गुरु प्रॉडकशन्स च्या ' दिल धक धक करे' या धमाल विनोदी नाटकाचा शुभ-मुहूर्त

* अमित मिश्रा

प्रबोधनकर ठाकरे नाट्यगृह येथे गुरु प्रॉडकशन्स  च्या ' दिल धक धक करे ' या धमाल विनोदी नाटकाचा शुभ मुहूर्त ज्येष्ठ अभिनेता प्रशांत दामले यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.


सुशील म्हशीलकर,संदीपराज, संजीव चव्हाण, निलेश देशपांडे, नवतारका कोमल, नवतारका वरदा, भावना,आणि प्रदीप कबरे यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात आहेत.
दिग्दर्शन आकाश आनंद, सहाय्यक दिग्दर्शन अविनाश बाबर, प्रकाश आनंद केळकर, रंगभूषा शरद विचारे तर संगीत अशोक पत्की यांचे लाभले आहे.


आरती प्रदीप कबरे, निर्मिती सूत्रधार असलेल्या *दिल धक धक करे* या नाटकाचा शुभारंभचा प्रयोग मंगळवार २४ मे रोजी रात्री ८:३० वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्य गृह बोरिवली येथे होणार आहे.