पिकल म्युझिकचं 'मी झालो तुझा' गाणं रसिकांच्या भेटीला....

पिकल म्युझिकचं 'मी झालो तुझा' गाणं रसिकांच्या भेटीला....

पिकल म्युझिकचं 'मी झालो तुझा' गाणं रसिकांच्या भेटीला....

* प्रतिनिधि

      सध्याच्या सिंगल्सच्या जमान्यात काही म्युझिक कंपन्या सातत्यानं नवनवीन गाण्यांचे नजराणे संगीतप्रेमींच्या दरबारात सादर करत आहेत. अर्थपूर्ण शब्दरचनांमध्ये लोभसवाणी कथा गुंफून समधुर संगीताच्या साथीनं रसिकांवर मोहिनी घालत आहेत. यात सध्या आघाडीवर असलेल्या पिकल म्युझिकनं आणखी एक नवं कोरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांची पिकल म्युझिक आणि फिल्मीटीकल प्रोडक्शनची प्रस्तुती असलेलं 'मी झालो तुझा' हे गाणं नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. अत्यंत कमी अवधीमध्ये या गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून, लाँचनंतर लगेचच विक्रमी लाईक्स मिळवण्याच्या दृष्टीनं वाटचाल सुरू केली आहे.

     प्रथमेश सूर्यकांत माळी यांची निर्मिती असलेलं 'मी झालो तुझा' हे गाणं बऱ्याच कारणांमुळं रसिकांच्या स्मरणात राहणारं ठरणार आहे. नयनरम्य लोकेशन्स, आकंठ प्रेमात बुडालेली मुख्य कलाकारांची जोडी, अर्थपूर्ण गीतरचना, सुमधूर गायन, श्रवणीय संगीतरचना आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांनी परिपूर्ण असलेलं हे गाणं जणू संगीतप्रेमींसाठी नजराणाच ठरलं आहे. सणासुदीच्या दिवसांमध्ये रसिकांचा आनंद द्विगुणीत करणारं हे गाणं नील देवगडे यांनी लिहिलं असून, त्यांनीच कम्पोझही केलं आहे. नील यांनीच युक्ता पाटील यांच्यासोबत हे गाणं गायलंही आहे. संगीतकार अमर गिरी यांनी या गाण्याला सुरेल संगीत देण्याचं काम केलं आहे. वैभव काळे यांनी या म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शन केलं आहे. अभिनेता बिपीन सुर्वे आणि अभिनेत्री ईशा रावल ही नवी कोरी जोडी या गाण्यात झळकली आहे. दोघांचं बाँडींग पाहताक्षणीच रसिकांचं लक्ष वेधून घेणारं आहे. 'मी झालो तुझा' या गाण्याच्या रूपात प्रेमाचा एक नवा रंग रसिकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची भावना समीर दीक्षित यांनी व्यक्त केली आहे. प्रेमावर आधारलेलं हे गाणं प्रत्येकाशी रिलेट करणारं असल्यानं सर्वांनाच ते आपलंसं वाटणारं असल्याचं दिग्दर्शक वैभव काळे यांचं म्हणणं आहे. संगीतकार म्हणून 'मी झालो तुझा' या गाण्याला संगीत देताना काही वेगळे प्रयोग करण्याचा मोह आवरता न आल्यानं वेगळ्या बाजाचं संगीत रसिकांना ऐकायला मिळत असल्याचं संगीतकार अमर गिरी म्हणाले. निर्माता या नात्यानं 'मी झालो तुझा' रूपात दर्जेदार निर्मितीमूल्ये असणारं गाणं रसिकांसमोर सादर करता आल्याचं समाधान प्रथमेश सूर्यकांत माळी यांनी व्यक्त केलं आहे.

   डिओपी सॅम धाकड यांनी 'मी झालो तुझा' या गाण्याची सिनेमॅटोग्राफी केली असून, कोरिओग्राफी ईशा रावल यांची आहे.  संकलन आणि डीआयचं काम आकाश कारभारी यांनी केलं आहे. दीपाली खामर यांनी मेकअर केला असून, रश्मी भटनागर यांनी कॅास्च्युम्स डिझाइन केले आहेत. या म्युझिक व्हिडीओचे प्रोडक्शन हेड शुभ रामदास असून, प्रतीक देशमुख आणि निरज पानगावकर यांनी प्रोडक्शन टिममध्ये मोलाची भूमिका बजावली आहे.