31st  December  : सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा GRAND FINALE संध्या. ७.०० वा. कलर्स मराठीवर...

31st  December  : सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा GRAND FINALE संध्या. ७.०० वा. कलर्स मराठीवर...

31st  December  : सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा GRAND FINALE संध्या. ७.०० वा. कलर्स मराठीवर...

* प्रतिनधि

    मुंबई २८ डिसेंबर :  कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा- आवाज तरुणाईचा’ या पर्वाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले. ‘जुनं ते सोनं, पण नवंही हवं’ हा प्रयोग प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. या पर्वातील सगळेच स्पर्धक उत्तम असून यांपैकी सर्वोत्तम ६ पर्वाच्या शेवटी येऊन पोहोचले आहेत. आवाज तरुणाईचा या पर्वाचा GRAND FINALE जवळ आला आहे. 

   ‘सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा’ GRAND Finale  सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स आणि मराठी सिनेसृष्टीतील लाडक्या कलाकारांच्या उपस्तिथीत पार पडणार आहे. 

   ‘सूर नवा ध्यास नवा’ चा GRAND FINALE दिमाखदार अंदाजात साजरा होणार आहे. हा अद्वितीय उत्सव, या पर्वाच्या सर्वोत्तम ६ स्पर्धकांचा कमाल परफॉर्मन्स, भव्य नृत्य प्रदर्शन आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित कलाकारांसोबत साजरा होणार आहे. 

    हा अतुलनीय उत्सव केवळ मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांचा नसून बॉलिवूड धक धक गर्ल माधुरी दीक्षित, दिग्गज कलाकार नाना पाटेकर, विनोदाचे बादशाह मकरंद अनासपुरे आणि आपल्या मधुर आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका साधना सरगम यांसारख्या प्रतिष्ठित कलाकारांच्या हजेरीने हा सोहळा आणखीनच GRAND होणार आहे. मनोरंजनाच्या जादूने भरलेल्या सोहळ्यात मग्न होण्यास सज्ज व्हा. 

   31st चा प्लॅन दिमाखात साजरा करण्यासाठी नक्की पाहा, *‘सूर नवा ध्यास नवा - आवाज तरुणाईचा’ , GRAND FINALE, रविवार, ३१ डिसेंबर, संध्या. ७.०० वा, आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.*