अभिनेत्री मोनालिसा बागल आणि अश्विनी बागल यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण...
एकमेकांवर जिवापाड प्रेम करणा-या मराठी इंडस्ट्रीतील बहिणी....
अभिनेत्री मोनालिसा बागल आणि अश्विनी बागल यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण...
* प्रतिनिधि
भावांसाठी रक्षाबंधनाचे जितके महत्त्व असते तितकेच महत्त्व बहिणी-बहिणींसाठी देखील असते. मोठा भाऊ या नात्याच्या असणा-या सर्व जबाबदा-या मोठी बहिण पार पाडत असते म्हणून छोट्या बहिणीसाठी ती तिचे रक्षण करणारा तिचा दादाच असतो.
एकमेकांवर जिवापाड प्रेम करणा-या मराठी इंडस्ट्रीतील बहिणी अभिनेत्री मोनालिसा बागल आणि अश्विनी बागल यांनी साजरा केला रक्षाबंधनाचा सण.
बहिणी पण दुस-या बहिणीची रक्षा करु शकते, एकमेकींना साथ देऊ शकते आणि त्यांच्यातील बंधन हे आणखी प्रेमाने घट्ट होऊ शकते हे मोनालिसा बागल आणि अश्विनी बागल यांच्या नात्यातून दिसून येते.