बांगुर नगर-गोरेगाव येथे विशाल हिंदू अध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन....!
बांगुर नगर-गोरेगाव येथे विशाल हिंदू अध्यात्मिक मेळाव्याचे आयोजन....!
* प्रतिनिधि
गोरेगांव : हिंदू अध्यात्मिक संस्थान द्वारा गोरेगाव पश्चिम, बांगुर नगर येथे विशाल हिंदू मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्घाटन राज्याचे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले तसेच केंद्रिय वाणिज्य मंत्री उत्तर मुंबई चे खासदार पीयूष गोयल ह्या कार्यक्रमात मुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
या विशाल हिंदू अध्यत्मिक मेळाव्याला उत्तर मुम्बई चे माजी खासदार व भाजपा नेते जनसेवक गोपाळ शेट्टी यांनी भेट दिली. तिथे असलेल्या विविध दालनांना त्यांनी भेट दिली.
या मेळाव्यात आयोजित केलेल्या योगसाधना, कन्या वंदन, गंगा आरती, गोमाता पुजन सारख्या कार्यक्रमात भाग घेतला तसेच विविध आरोग्य चिकित्सा शिबिर तसेच विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रम व अंबिका योग कुटिर, इस्कॉन यांच्या माध्यमातून असलेल्या विभागांना व त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गोपाळ शेट्टी यांनी उपस्थिती दर्शविली.
या प्रसंगी श्री अंबिका योग कुटिर व हिंदू आध्यात्मिक सेवा मेळाव्याच्या आयोजकां द्वारे जनसेवक गोपाळ शेट्टी यांचा सत्कार करण्यात आला.