'गेमाडपंथी'मध्ये होणार आता आणखी गेम !

'गेमाडपंथी'मध्ये होणार आता आणखी गेम !

'गेमाडपंथी'मध्ये होणार आता आणखी गेम !
_पुढील भाग प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित ...

* सिने प्रतिनिधि

            प्लॅनेट मराठी ओटीटीवर २ जून रोजी प्रदर्शित झालेल्या 'गेमाडपंथी' या कॉमेडी, थ्रिलर आणि रहस्यमय वेबसीरिजला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. मागील भागांमध्ये आपल्याला सरळ साध्या चिकूला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणारी हनी पाहिली. हनीच्या ट्रॅपमध्ये अडकलेल्या चिकूला किडनॅप करण्याचे प्लॅनिंग होत असतानाच त्यात अनेकांचे गेम होत आहेत. आता हे किडनॅपिंग का होत आहे आणि या किडनॅपिंगच्या जाळ्यात कोण कोण अडकणार, हे येत्या शुक्रवारी म्हणजेच ९ जून रोजी प्रदर्शित झालेल्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, दि फिल्म क्लिक स्टुडिओज निर्मित, संतोष कोल्हे दिग्दर्शित या  वेबसीरिजमध्ये चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे, प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, समीर पाटील, दिगंबर नाईक, सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

      दिग्दर्शक संतोष कोल्हे म्हणतात, '' हनीट्रॅपमध्ये अडकलेल्या चिकूला काही जण किडनॅप करण्याचा प्लॅन करत आहेत. हा सगळं गोंधळ गुंतागुंतीचा आहे. 'गेमाडपंथी'चा मागील भाग एका अशा वळणावर येऊन थांबला आहे. जिथे प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे ती  चिकूच्या आयुष्यात आता पुढे काय होणार याची. मात्र पुढील भागांमध्ये हा गोंधळ अधिकच वाढणार आहे.'' तर प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, '' पहिल्या काही भागांना मिळालेला प्रतिसाद पाहता ही  वेबसीरिज प्रेक्षकांना आवडली आहे. मुळात ही  वेबसीरिज शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही प्रेक्षकांना समोर ठेवून बनवण्यात आल्यामुळे त्याला इतका जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. नव्याने प्रदर्शित झालेले भागही प्रेक्षकांना आवडतील.''