'फक्त मराठी सिने सन्मान' सन्मान मराठी अस्मितेचा, २१ ऑगस्ट ला पहा फक्त मराठी वर
'फक्त मराठी सिने सन्मान' सन्मान मराठी अस्मितेचा, २१ ऑगस्ट ला पहा फक्त मराठी वर
* प्रतिनिधि
मराठी प्रेक्षकांची आवड निवड ही मराठी मातीशी, मराठी संस्कृतीशी जोडलेली असते आणि तीच आवड ओळखून 'फक्त मराठी' ही वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस आली. बदलत्या काळासोबत बदलत चाललेलं मनोरंजन विश्व यांचा समतोल राखत फक्त मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिका आणि चित्रपट अशा दोन्ही माध्यमांना या वाहिनीने एकरूप करत प्रेक्षकांची मन जिंकली. मराठी प्रेक्षकांची नस ओळखलेल्या या वाहिनीनेने आता मनोरंजन विश्वाला अजून आपलंस करत 'फक्त मराठी सिने सन्मान' हा पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. कोरोना नंतर पूर्वरत झालेल्या मनोरंजन सृष्टीच्या पंखांना बळ देण्यासाठी तसेच मनोरंजन सृष्टीत असलेल्या मराठी अस्मितेचा सन्मान करण्यासाठी या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन फक्त मराठी वाहिनीने केले होते. गेल्यावर्ष भरात मराठी चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं तर जिंकलीच पण त्याचबरोबर बॉक्स ऑफिस वर सुद्धा त्यांनी विक्रमी कमाई केली आहे. याच चित्रपटांचा सन्मान 'फक्त मराठी सिने सन्मान' मध्ये करण्यात आला आहे. या सोहळ्याचे रंगतदार प्रक्षेपण येत्या २१ ऑगस्ट रोजी फक्त मराठी वर होणार आहे.
फक्त मराठी सिने सन्मान हा कलाकारांपुरता मर्यादित नसून हा सन्मान मराठी मनोरंजन सृष्टीला महत्वाचं योगदान देणाऱ्या प्रत्येक तंत्रज्ञ आणि पडद्याच्या मागे असलेल्या कलाकाराचा आहे. हा सन्मान सोहळा चित्रपट सृष्टीसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. सिद्धार्थ जाधव, प्रसाद ओक, मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी अशा अनेक चित्रपट कलाकारांनी या सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्याला चार चांद लावणारी बाब म्हणजे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या विद्या बालन यांनी विद्याधर भट्टे या हरहुन्नरी रंगभूषाकाराचा केलेला गौरव. विद्याधर भट्टे यांनी रंगभूषा करत अनेक कलावंतांना चरित्र भूमिकेसाठी तयार केले आहे. या रंगभूषेमुळे चरित्र भूमिका करणारा कलाकार त्या पात्राच्या जवळ जाऊ शकला आहे. तर या रंगभूषाकाराने चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान हे अमूल्य असून त्याचाच गौरव फक्त मराठी सिने सन्मानच्या व्यासपीठावर झाला आहे. मराठी चित्रपटसृष्टीला सुवर्ण काळ दाखवणारे आणि अवघे पाऊणशे वयोमान आहे असं म्हणणारे महाराष्ट्राचे लाडके दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा गौरव या सन्मान सोहळ्यात करण्यात आला. हा विशेष सन्मान सचिन पिळगावकर यांची आई आणि कुटुंबीय यांच्या हस्ते करण्यात आला आहे. धर्मवीर, चंद्रमुखी, सोयरीक, लोच्या झाला रे, पांघरूण अशा अनेक चित्रपटांना या सिने सन्मान सोहळ्यात नामांकन प्राप्त झाले आहे. तर सूत्र संचालकांची नवीन जोडी या सिने सन्मान मराठी पुरस्कार सोहळ्याने दिली ती म्हणजे अमेय वाघ आणि ओंकार भोजने. या दोघांच्या तुफान विनोदी षटकारांनी फक्त मराठी सिने सन्मान उजळून निघाला. या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर नवतारका प्रियदर्शिनी इंदलकर ही कलाकारांशी गुज गोष्टी करत या सोहळ्याच्या बाबतीत त्यांच्या मनातील भावना जाणून घेत होती. आता त्या भावना आणि गुजगोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर येत्या २१ तारखेला पहायला विसरू नका 'फक्त मराठी सिने सन्मान' आपल्या लाडक्या 'फक्त मराठी' वाहिनीवर.