एक खोटारडी.. तर दुसरी कोण असेल? 'विश्वामित्र'मधील 'खोटारडी' हे अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला ...
एक खोटारडी.. तर दुसरी कोण असेल? 'विश्वामित्र'मधील 'खोटारडी' हे अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला ...
* सिने प्रतिनिधि
एकविरा म्युझिक प्रस्तुत 'विश्वामित्र' या अल्बममधील तीन गाणी प्रदर्शित झाल्यानंतर आता अखेरचे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'विश्वामित्र', 'तुझ्याविना' आणि `दूर दूर' या तीनही गाण्यांना संगीतप्रेमींचा भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या अल्बममधील 'खोटारडी' हे तुटलेल्या हृदयाची कहाणी सांगणारे गाणे प्रदर्शित झाले आहे. अवधूत गुप्ते यांनी शब्दबद्ध, संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला आवाजही त्यांचाच लाभला आहे. पुष्कर जोग, पूर्णिमा डे, चैत्राली घुले आणि अवधूत गुप्ते यांच्यावर चित्रित झालेले हे रेट्रो साँग नॉस्टॅल्जिक फील देतेय.
या गाण्याबद्दल अवधूत गुप्ते म्हणतात, " प्रेमात दुरावा आला की प्रत्येकाची नाती तुटतात. प्रेमात दुरावा येण्याची प्रत्येकाची करणे वेगवेगळी असतात. `खोटारडी`या गाण्यातूनही तुटलेल्या हृदयाची एक नवीन गोष्ट भेटीला येणार आहे. 'विश्वामित्र' अल्बममधील हे अखेरचे गाणे असून मला हृदय तुटलेला प्रत्येक जण हे गाणे स्वतःशी जोडण्याचा प्रयत्न करेल. ज्याप्रमाणे प्रेक्षकांनी आधीच्या गाण्यावर प्रेम केले तसेच प्रेम या गाण्यावरही करतील. या गाण्याचा बाज वेगळा आहे, लूक वेगळा आहे. चारही गाण्यांची संकल्पना एक असली तरीही चारही गाणी वेगळ्या धाटणीची होती. प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादामुळेच अशी कलाकृती सादर करण्याची स्फूर्ती मिळते.''