Planet Marathi OTT : 'प्लॅनेट मराठी ओटीटी'ची यशस्वी मनोरंजनाची वर्षपूर्ती
'प्लॅनेट मराठी ओटीटी'ची यशस्वी मनोरंजनाची वर्षपूर्ती
* सिने प्रतिनिधी
गेल्या वर्षी ३१ ऑगस्ट रोजी 'प्लॅनेट मराठी ओटीटी' प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले होते. गेल्या वर्षापासून सुरु झालेली मनोरंजनाची धम्माल आजही अविरतपणे सुरु आहे. सोप्पं नसतं काही, जून, पॉंडीचेरी, अनुराधा, रानबाजार, मी पुन्हा येईन, चिकटगुंडे व बदली या वेबफिल्म्स्, वेबसीरिज, तसेच भीमाण्णा, ओव्यांचा खजिना यासारख्यां कार्यक्रमांसोबतचं अनेक नाविण्यपूर्ण वेबफिल्म, वेबसीरिज तसेच शॉर्टफिल्म्स, लाईव्ह इव्हेंट्स, कॉन्सर्ट्स, म्युजिक व्हिडीओज ना प्रेक्षकांकडून भरघोस प्रतिसाद मिळतोय.
येत्या वर्षात 'प्लॅनेट मराठी ओटीटी' आपल्या प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचा धमाका करणार आहे. एका पेक्षा एक दर्जेदार वेबसीरिज आणि उत्तम आशयांचे असलेले चित्रपट प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. येत्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला 'बेबी ऑन बोर्ड', 'राजी-नामा', 'एका हाताचं अंतर', 'अथांग', 'सोप्पं नसतं काही २', 'गेमाडपंथी', 'कंपास', 'आमचं आहे', 'सहेला रे', 'क्रिप्टो(Crypto) आज्जी' या व याहून अधिक दर्जेदार वेबसीरिज, वेबफिल्म्स आणि शॉर्टफिल्म्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
'प्लॅनेट मराठी ओटीटी'च्या वर्षपूर्ती निमित्त प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " 'प्लॅनेट मराठी ओटीटी'ची मनोरंजनाची यशस्वी घौडदौड गेल्या वर्षापासून सुरु झाली. अनेक दर्जेदार आशय आम्ही गेल्या वर्षी दिले, त्यांना चांगला भरघोस प्रतिसादही प्रेक्षकांनी दिला. येत्या वर्षी अनेक चांगले दर्जेदार प्रोजेक्ट्स प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहोत. बहुप्रतिक्षीत वेबफिल्म्स, वेबसीरिज व शॉर्टफिल्म्स येत्या वर्षात प्रेक्षकांच्या समोर येणार आहेत. गेल्या वर्षी दिलेल्या आशयांपेक्षा येत्या वर्षी प्रेक्षकांच्या समोर अभिनयात कसलेल्या कलाकारांची कलाकृती अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे ' प्लॅनेट मराठी ओटीटी' च्या प्रेक्षकांसाठी येणारे वर्ष अनेक नवनव्या कलाकृतींचे असणार आहे. आत्तापर्यंत जसे प्रेम दिले, तसेच प्रेम यापुढेही प्रेक्षक देतील अशी मला खात्री आहे."