Zee मराठी : उत्सव नात्यांचा, जल्लोष गणरायाचा ...

Zee मराठी : उत्सव नात्यांचा, जल्लोष गणरायाचा ...

Zee मराठी : उत्सव नात्यांचा, जल्लोष गणरायाचा ...

* प्रतिनिधि

      ह्या वर्षीचा गणेश उत्सव खूप जबरदस्त असणार आहे कारण दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षीही झी मराठी घेऊन येत आहे 'उत्सव नात्यांचा, जल्लोष गणरायाचा'. लवकरच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार असून त्याच्या आगमनाच्या तयारीसाठी सगळ्यांनी कंबर कसली आहे.

    गणपती हा विघ्नहर्ता आहे, ६४ कलांचा अधिपती आहे. मग या गणेशोत्सवात मालिकेतील कलाकार मंडळी कशी मागे राहतील, ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘सारं काही तिच्या साठी’, ‘तू चाल पुढं’,‘तुला शिकवीन चांगलाच धडा’,‘दार उघड बये’, 'नवा गडी नवं राज्य', 'सातव्या मुलीची सातवी मुलगी', '३६ गुणी जोडी',‘चला हवा येऊ द्या’आणि  'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' च्या छोट्या स्पर्धकांनी सुद्धा  गणरायाच्या आगमनाची  जोरदार तयारी सुरु केली आहे.

   अप्रतिम सूत्र संचालन, सुंदर  गायकी व बहारदार नृत्य ह्या सर्व कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे. हा कार्यक्रम   १७ सप्टेंबरला म्हणजेच येत्या रविवार दुपारी १२ वा. आणि संध्या. ६ वा. फक्त आपल्या झी मराठी पाहता येणार आहे.

    अजून एक भन्नाट गोष्ट म्हणजे 'बोल बाप्पा' ह्या कार्यक्रम मुंबई, पुणे शहरातील सुप्रसिद्ध गणेश मंडळासोबत रंगणार असून ह्या मंडळांमध्ये धम्माल मजा मस्ती देखील होणार आहे.

   ‘बोलबाप्पा’ हा कार्यक्रम १९ ते २७ सप्टेंबर रोज संध्या. ५.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर पाहता येणार आहे.