बॉक्स ऑफ़िस सह ट्विटरवर ‘धर्मवीर’ जोरदार!
बॉक्स ऑफ़िस सह ट्विटरवर ‘धर्मवीर’ जोरदार! पहिल्याच दिवशी केली २.०५ कोटींची घसघशीत कमाई !
- 'हॅशटॅग धर्मवीर' देशभर होतोय ट्विटरवर ट्रेंड
- प्रतिनिधि
‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतर नव नवे विक्रम करत आहे. चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला, याचाच अजून एक प्रत्यय म्हणजे, आज दिवसभर ट्विटरवर हॅशटॅग धर्मवीर (#Dharmaveer) पूर्ण देशभरातुन ट्रेडिंग वर आहे..
धर्मवीर आनंद दिघे यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसाद ओक यांचा हा तेजस्वी आणि करारी बाण्याचा प्रेक्षकांना भावतोय.. सध्या सर्वत्र धर्मवीरचीच चर्चा असून ट्विटरही याला अपवाद ठरलं नाहीए..
झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला, आणि प्रविण तरडे यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा चित्रपट येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला आहे.