अनेक वेबसिरीजना मागे टाकणारी 'रानबाजार' लवकरच 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर ... !

अनेक वेबसिरीजना मागे टाकणारी 'रानबाजार' लवकरच 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर ... !

अनेक वेबसिरीजना मागे टाकणारी 'रानबाजार' लवकरच 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर ... !

टिझरला एका दिवसात १० लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद... !!

* प्रतिनिधि

वेबविश्वाला हादरवून टाकणारी 'रानबाजार' ही वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १८ मे रोजी या वेबसिरीजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा टिझर सोशल मीडियावर झळकत आहे. या दोन्ही टिझरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे. प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांनी या टिझरच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एका दिवसात या टिझरला  १० लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले असून सोशल मीडियावर या टिझरवर प्रेक्षकांच्या उस्फुर्त प्रतिक्रिया मिळत आहेत. 

अभिजित पानसे दिग्दर्शित पॉलिटिकल क्राईम थ्रिलर असलेल्या या भव्य वेबसिरीजची निर्मिती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, रावण फ्युचर प्रॉडक्शन्स आणि अभिजित पानसे,अनिता पालांडे यांनी केली असून ‘रानबाजार’ येत्या २० मे पासून 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.