सारं काही तिच्यासाठी : उमा, संध्याची इच्छा पूर्ण करू शकेल का ?
सारं काही तिच्यासाठी : उमा, संध्याची इच्छा पूर्ण करू शकेल का ?
* प्रतिनिधि
झी मराठी वरील 'सारं काही तिच्यासाठी' ह्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक भावनिक स्थान निर्माण केले असून ह्या मालिकेतले सगळी नाती प्रेक्षकांच्या पसंतीत पडत आहेत.
आतापर्यंतच्या भागात आपण पहिले की संध्याचे कॅन्सरने निधंन झालं तेव्हा संध्याने शेवटच्या क्षणी उमा कडून वचन घेतलं की ओवीचा ती सांभाळ करेल, तसेच सांध्याची अजून एक इच्छा आहे की तिचे सगळे मरणोपरांत विधी गावी म्हणजेच कोकणात व्हावे. उमा संध्या गेल्याची दुःखद गोष्ट व तिची अंत्य विधी गावी करण्याची इच्छा रघुनाथला सांगते.
रघुनाथसाठी तो एक धक्का असतो व त्यातून सावरून तो विधीसाठी परवानगी देतो. पण उमाने संध्याला ओवीला सांभाळण्याबद्दल जे वचन दिले आहे ते रघुनाथला सांगू शकेल का ? हा गुंता कसा सोडवला जाईल ह्या सर्व प्रश्नाच्या उत्तरासाठी पाहायला विसरू नका 'सारं काही तिच्यासाठी' संध्या ७:०० वा. फक्त आपल्या झी मराठी वर.