प्रेक्षकांना बेफाम नाचवायला लावणार 'सोसना वेटिंग’ : 'समरेणू'तील नवीन गाणे झळकले 

प्रेक्षकांना बेफाम नाचवायला लावणार 'सोसना वेटिंग’ : 'समरेणू'तील नवीन गाणे झळकले 

प्रेक्षकांना बेफाम नाचवायला लावणार 'सोसना वेटिंग’ : समरेणू'तील नवीन गाणे झळकले 

* अमित मिश्रा

प्रेमाची व्याख्या सांगणारा महेश डोंगरे दिग्दर्शित ‘समरेणू’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत्या १३ मे रोजी येत आहे. काही दिवसांपूर्वी ‘समरेणू’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्यानंतर आता ‘समरेणू’ चित्रपटातील 'सोसना वेटिंग' हे गाणे सोशल मीडियावर धुमाकुळ घालताना दिसत आहे. आवाज लाऊड करून, दणक्यात सगळ्यांना नाचवायला लावणारे हे गाणे अतिशय जोशपूर्ण आहे. या गाण्याला आदर्श शिंदे यांचा दमदार आवाज लाभला आहे. गुरू ठाकुर यांनी शब्दबद्ध केलेल्या गाण्याला सुरज- धीरज यांचे संगीत दिले आहे. 


   
 चित्रपटाचे दिग्दर्शक महेश डोंगरे म्हणतात, “ हे लग्नातील गाणे अतिशय जल्लोषमय असून सर्वांनाच ठेका धरायला लावणारे आहे. चित्रपटातील इतर गाण्यांना ज्याप्रमाणे संगीतप्रेमींनी प्रेम दिले त्याप्रमाणेच या गाण्यालाही रसिक भरभरून प्रतिसाद देत आहेत. 'समरेणू' मध्ये प्रेमगीत, विरह गीत अशा सगळ्याच प्रकारचे संगीत आहे. आता प्रेक्षकांचा उत्साह वाढवण्यासाठी 'सोसना वेटिंग’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे." 

'समरेणू' ची निर्मिती एमआर फिल्म्स वर्ल्डची असून प्रमोद कवडे, बाळासाहेब बोरकर, बालाजी मोरे, युवराज शेलार सहनिर्माता आहेत. या चित्रपटात महेश डोंगरे, रूचिता मांगडे, भरत लिमण यांच्या प्रमुख भूमिका आहेत.