'प्रेम करावं पण जपुन' या नाटकाचा ५० वा सुवर्ण महोत्सवी प्रयोग जल्लोषात संपन्न
मधुसंगिता थिएटर्स आणि अर्चना थिएटर्स निर्मित....
'प्रेम करावं पण जपुन' या नाटकाचा ५० वा सुवर्ण महोत्सवी प्रयोग जल्लोषात संपन्न
* नाट्य प्रतिनिधि
नव्या युगातील प्रेम संबंध समजावून सांगणारं नाटक म्हणजे 'प्रेम करावं पण जपुन'. मधुसंगिता थिएटर्स आणि अर्चना थिएटर्स निर्मित 'प्रेम करावं पण जपुन' या नाटकाचा ५० वा सुवर्ण महोत्सवी प्रयोग महाकवी कालिदास नाट्यगृह, मुलुंड येथे अनेक दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत सोहळा आनंदात पार पडला. हास्यजत्रा फेम पृथ्वीक प्रताप, ठिपक्यांची रांगोळी फेम स्वप्नील काळे तसेच सोशल मिडिया स्टार सुरज खरात (पिंट्या) आणि समृद्धी टक्के (पिंकी) यांची या सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती होती.
मधुसंगिता थिएटर्स आणि अर्चना थिएटर्स निर्मित 'प्रेम करावं पण जपुन' या नाटकाचे लेखन 'संकेत शेटगे' यांनी केले आहे तर या नाटकाचे दिग्दर्शन विशाल - दिपेश यांनी मिळून केले आहे. मृदुला कुलकर्णी, संकेत शेटगे, भक्ती तारलेकर, विशाल असगणकर या कलाकारांची या नाटकात प्रमुख भूमिका आहे.
नाटकाच्या निर्मात्या माधुरी तांबे नाटकाविषयी सांगतात, "आमची संपूर्ण नाटकाची टीम नविन आहे. परंतु मला सांगायला आनंद होत आहे की नाटकातील कलाकार नवखे असूनही आज या नाटकाचा ५० वा प्रयोग हाऊसफुल्ल झाला. प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून असं वाटतंय की या नाटकाचे लवकरच १०० हून अधिक प्रयोग लवकरच होतील. मी नाटकाच्या टीमचे आणि मायबाप प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते. त्यांचं प्रेम आमच्यावर असचं कायम राहू देत."