नवीन वर्षात प्लॅनेट मराठीकडून मिळणार मनोरंजनाचे धमाकेदार सरप्राईज
![नवीन वर्षात प्लॅनेट मराठीकडून मिळणार मनोरंजनाचे धमाकेदार सरप्राईज](https://pen-n-lens.in/uploads/images/2022/12/image_750x_63aacd8e3fd70.jpg)
नवीन वर्षात प्लॅनेट मराठीकडून मिळणार मनोरंजनाचे धमाकेदार सरप्राईज
_२०२३ मध्ये मिळणार प्लॅनेट मराठीवर रिॲलिटी शोची मेजवानी
* सिने प्रतिनिधि
प्लॅनेट मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम कलाकृती, नवनवीन विषयांवरील चित्रपट, वेबसीरिज, लघुपट, बहारदार गाणी यांसारखी मनोरंजनाची मेजवानी आणत असते. अल्पावधीतच प्लॅनेट मराठीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. या एका वर्षात प्लॅनेट मराठीने खूप मोठा पल्ला पार केला. २०२२ मध्ये प्लॅनेट मराठीने अनेक रेकॉर्डब्रेक चित्रपट, वेबसीरिज, गाणी, लघुपट प्रेक्षकांच्या भेटीस आणले.
६८व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘गोष्ट एका पैठणीची’ 'सर्वोत्कृष्ट चित्रपटा'चा मानकरी ठरला तर ‘सुमी’ने सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट' म्हणून पुरस्कार मिळवला. तसेच यावर्षी सुपरहिट ठरलेले ‘चंद्रमुखी’, ‘तमाशा लाईव्ह’, ‘सहेला रे’ सारखे दर्जेदार चित्रपट असो किंवा ‘अनुराधा’, ‘मी पुन्हा येईन’, ‘रानबाजार’, ‘अथांग’ यांसारख्या सर्वात जास्त पाहिल्या गेलेल्या वेबसीरिज असो. हे सर्व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. प्रेक्षकांनी या चित्रपटांना आणि वेबसीरिजना खूप प्रेम दिले. २०२२ प्रमाणेच प्लॅनेट मराठी आता २०२३ मध्येही प्रेक्षकांसाठी अनेक वेब शो, चित्रपट, लघुपट आणि काही खास सरप्राईज घेऊन येण्यास सज्ज झाले आहे. नवीन वर्षातही प्लॅनेट मराठी मनोरंजनाचा धमाका घेऊन येणार आहे.
प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, " २०२२ हे वर्ष आमच्यासाठी खूप छान गेले. यावर्षी अनेक पुरस्कार, अनेक उद्दिष्टये साध्य करता आली. चांगला आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो. खरंतर प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद हाच आमच्यासाठी मौल्यवान आहे. २०२३ मध्ये अनेक चित्रपट, वेबसीरिज आम्ही प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहोत. सोबतच यावेळी रिॲलिटी शोवर जास्त भर देण्याचा प्रयत्न असेल. यामुळे नवोदितांच्या कलागुणांना वाव मिळेल. २०२२ मध्ये अनेक गोष्टी साध्य केल्या, आता आम्ही पुन्हा नवीन वर्षी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झालो आहोत आणि २०२३ त्याहूनही धमाका असणार आहे. "