"मैं नहीं तो कौन बे" म्हणत सृष्टी तावडे ची हास्याच्या मंचावर एन्ट्री
"मैं नहीं तो कौन बे" म्हणत सृष्टी तावडे ची हास्याच्या मंचावर एन्ट्री...
_ "महाराष्ट्राची हास्यजत्रा" कॉमेडीची हॅटट्रीक, सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर...
* प्रतिनिधि
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने महाराष्ट्रातल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या कार्यक्रमाचे अनेक चाहते आहेत आणि यामध्ये अनेक दिग्गज नामवंतांचाही समावेश आहे. "महाराष्ट्राची हास्यजत्रा" हा कार्यक्रम नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होते आहेच. आता महाराष्ट्राची हास्यजत्रा कॉमेडीची हॅटट्रीक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नवं सीजन म्हटलं कि काहीतरी नवनवीन गोष्टी आपल्याला या सीजन मध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहेत. त्यातील एक सरप्राईस येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
भारतातील सुप्रसिद्ध रॅपर सृष्टी तावडे महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर येणार आहे. हास्याचा मंचावर सृष्टी हास्यकलाकारांसोबत स्कीट करताना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित होणार आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा चा मंचावर सृष्टी चा रॅप सॉंग देखील सादर करणार आहे. आजवर तिच्या गाण्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले पण आता तिच्या अभिनयाची झलक प्रेक्षकांना हास्यजत्रेच्या मंचावरून पाहता येईल. मैं नहीं तो कौन बे या सृष्टी च्या फेमस गाण्यावर सगळ्या हास्यकलाकारांनी देखील ताल धरला.
या प्रहसनामध्ये सृष्टी सोबत हास्यकलाकार समीर चौघुले, प्रसाद खांडकेकर, वनिता खरात, अरुण कदम आणि ओंकार राऊत पाहायला मिळणार आहेत. आता या हास्यकलाकारांसोबत मिळून सृष्टी तावडे काय धमाल करणार हे आपल्याला नव्या भागात पाहता येईल. त्यासोबतच सृष्टी ने महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमावरील आपले प्रेम रॅप सॉंग द्वारे व्यक्त करणार आहे. त्याव्यतिरिक्त आणखीन एक गाणे सृष्टी सादर करणार आहे. हे गाणे पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
तर पाहायला विसरू नका "महाराष्ट्राची हास्यजत्रा" कॉमेडीची हॅटट्रीक २ डिसेंबर पासून सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता सोनी मराठी वाहिनीवर.