SONY MARATHI 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर रेणुका शहाणे आणि अमेय वाघ....
SONY MARATHI 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर रेणुका शहाणे आणि अमेय वाघ....
_पाहा, 'कोण होणार करोडपती' विशेष भाग - ८ जुलै, शनिवारी रात्री ९ वाजता, सोनी मराठी वाहिनीवर
* प्रतिनिधि
जनसामान्यांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे 'कोण होणार करोडपती'. सचिन खेडेकर यांचं बहारदार सूत्रसंचालन हे या कार्यक्रमाचं खास वैशिष्ट्य. या आठवड्यात ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या शनिवारच्या ‘विशेष भागात' रेणुका शहाणे आणि अमेय वाघ हे हॉट सीटवर येणार आहेत. रेणुका शहाणे आणि अमेय वाघ 'कोण होणार करोडपती'चा खेळ मुक्तांगण मित्रसाठी खेळणार आहेत. मुक्तांगण मित्र या फाउंडेशनसाठी ते 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. या पर्वातील हा विशेष भाग असणार आहे आणि या भागात रेणुका शहाणे आणि अमेय वाघ यांच्याशी गप्पा रंगणार आहेत.
रेणुका शहाणे आणि अमेय वाघ हे 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर व्यक्त झाले. सचिन खेडेकरांबरोबर त्यांच्या गप्पा रंगल्या. त्यांनी याआधी फार सुंदर अशा कलाकृतींमध्ये एकत्र काम केले आहे. अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांचा गाजलेला चित्रपट मुरंबा. मुरंबा चित्रपटाशी निगडित आठवणी या वेळी त्यांनी व्यक्त केल्या. रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर यांनी सैलाब या हिंदी मालिकेत एकत्र काम केले होते. त्याच्या आठवणी आज 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. यामागचं विशेष कारण म्हणजे रेणुका शहाणे आणि सचिन खेडेकर यांना सैलाब मालिकेचे दिग्दर्शक रवी राय हे व्हिडिओ कॉलद्वारे भेटले. त्या वेळी मालिकेच्या जुन्या आठवणी मंचावर ताज्या झाल्या. रेणुका शहाणे आणि अमेय वाघ हे 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर मुक्तांगण मित्र या फाउंडेशनसाठी खेळणार आहेत. मंचावर चर्चा रंगली रेणुका शहाणे आणि अमेय वाघ यांच्या जोडीदारांची. अमेय आणि साजिरी यांची पहिली भेट ते लग्न असा आत्तापर्यंतचा प्रवास त्याने या मंचावर सांगितला. रेणुका शहाणे आणि आशुतोष राणा यांच्या भेटीचा किस्सा त्यांनी सांगितला.
आता मुक्तांगण मित्रसाठी खेळताना 'कोण होणार करोडपाती'च्या खेळात रेणुका शहाणे आणि अमेय वाघ किती रक्कत जिंकतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. पाहायला विसरू नका,'कोण होणार करोडपती' - विशेष, ८ जुलै, शनिवारी रात्री ९ वाजता, फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.