तुझेच मी गीत गात आहेच्या निमित्ताने उर्मिला कोठारेला सेटवर भेटली चिमुकली मैत्रीण
![तुझेच मी गीत गात आहेच्या निमित्ताने उर्मिला कोठारेला सेटवर भेटली चिमुकली मैत्रीण](https://pen-n-lens.in/uploads/images/2022/05/image_750x_62814e4fa6446.jpg)
स्वराची आई होताना...
तुझेच मी गीत गात आहेच्या निमित्ताने उर्मिला कोठारेला सेटवर भेटली चिमुकली मैत्रीण
* प्रतिनिधि
स्टार प्रवाहवर सुरु झालेल्या तुझेच मी गीत गात आहे मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. मालिकेत स्वरा आणि वैदेही म्हणजेच अवनी तायवाडे आणि उर्मिला कोठारे यांचे सीन्सही खूप छान रंगत आहेत. पडद्यावरच्या या मायलेकी खऱ्या आयुष्यातही एकमेकांच्या मायलेकी झाल्या आहेत. उर्मिला आपल्या लेकीप्रमाणेच म्हणजेच जिजाप्रमाणे स्वराची काळजी घेते. इतक्या लहान वयातही स्वरामध्ये असलेला समजूतदारपणा उर्मिलाला विशेष भावतो. दोघींमधली हीच भन्नाट केमिस्ट्री मालिकेत नवे रंग भरत आहे. उर्मिलाची लेक म्हणजेच जिजा देखिल बऱ्याचदा तुझेच मी गीत गात आहेच्या सेटवर जात असते. सुरुवातीला आपली आई या कोणत्या नव्या मुलीचे लाड करतेय असं जिजाला वाटायचं. पण आता जिजा आणि स्वरामध्येही छान गट्टी जमली आहे. शूटिंगमधून वेळ मिळाला की या दोघींचीही सेटवर धमाल सुरु असते. खरतर जिजामुळेच मला स्वराची आई साकारणं शक्य झाल्याचं उर्मिला सांगते. लहानग्यांसोबत लहान कसं व्हायचं हे मी जिजामुळेच शिकलेय. त्यामुळे सेटवरच्या या लेकीसोबत माझी खास गट्टी जमली आहे.
माय-लेकीच्या प्रेमाची साक्ष देणारी ही मालिका पाहायला विसरु नका दररोज रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर.