स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेत नवा ट्विस्ट : अभिनेत्री वीणा जगपातची होणार एण्ट्री

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेत नवा ट्विस्ट : अभिनेत्री वीणा जगपातची होणार एण्ट्री

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेत नवा ट्विस्ट : अभिनेत्री वीणा जगपातची होणार एण्ट्री

* प्रतिनिधि

     स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. कानेटकर कुटुंब प्रेक्षकांच्या कुटुंबाचाच एक भाग झालंय. लवकरच या कुटुंबात नव्या सदस्याची एण्ट्री होणार आहे. या नव्या सदस्याचं नाव आहे अवंतिका कानेटकर चौधरी.

अवंतिका ही विनायक कानेटकरांची मुलगी. प्रेमविवाह केला म्हणून तिला कुटुंबापासून कायमचं दूर करण्यात आलं. इतक्या वर्षांनंतर पुन्हा अवंतिका कानेटकर कुटुंबात दाखल होणार आहे. अवंतिकाच्या येण्याचं नेमकं कारण काय याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.

 सुप्रसिद्ध अभिनेत्री वीणा जगताप अवंतिकाची भूमिका साकारत असून हे पात्र साकारण्यासाठी ती अतिशय उत्सुक आहे. स्टार प्रवाहसोबतची तिची ही पहिलीच मालिका. मात्र पहिल्याच दिवशी सेटवर तिची सर्वांसोबतच छान मैत्री झालीय. कानेटकर कुटुंबाची मी चाहती होतेच; या कुटुंबाचा भाग होताना अतिशय आनंद होतोय अशी भावना वीणाने व्यक्त केली.

 अवंतिका या व्यक्तिरेखेबद्दल सांगताना ती म्हणाली, अवंतिका आर्थिक सल्लागार आहे. उच्चशिक्षित असली तरी आपल्या रितीपरंपरा जपणारी. अवंतिका हे पात्र माझ्या स्वभावाच्या अगदी मिळतं जुळतं आहे असं मला वाटतं. जे असेल ते समोरासमोर बोलून मोकळी होणारी अशी अवंतिका साकारण्यासाठी मी खूपच उत्सुक आहे.

- तेव्हा पाहायला विसरु नका ठिपक्यांची रांगोळी सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.