‘रानबाजार’ची सक्सेस पार्टी दणक्यात साजरी
‘रानबाजार’ची सक्सेस पार्टी दणक्यात साजरी ...
- आणि हैप्पी बर्थडे टू अक्षय बर्दापूरकर
* अमित मिश्रा
वेबविश्वाला हादरून लावणाऱ्या अभिजित पानसे लिखित, दिग्दर्शित ‘रानबाजार’ने अल्पावधितच ओटीटी प्लॅटफॉर्म गाजवला. कदाचित असं काही घडलं होतं, असा मनात विचार आणणाऱ्या या वेबसीरिजची क्षणोक्षणी रंजक वळणावर नेणारी दमदार कथा आणि तगड्या स्टारकास्टने अक्षरशः खळबळ माजवली.
प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी, रावण फ्युचर प्रॅाडक्शन, अभिजित पानसे, अनिता पालांडे निर्मित ‘रानबाजार’ला अल्पावधितच असंख्य व्ह्यूज मिळाले. सबस्क्राइबर्सच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली. टिझर बघून मनात अनेक प्रश्न निर्माण झालेल्या अनेकांनी वेबसीरिज पाहून, त्याचे भरभरून कौतुक केले.
अशा या भव्य, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वेबसीरिजने आपल्या या यशाचे नुकतेच धुमधडाक्यात सेलिब्रेशन केले.
हा योगायोग जुळून आला ‘रानबाजार’चे निर्माता आणि प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने.
या वेळी ‘रानबाजर’च्या संपूर्ण टीमसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते.
या वेळी दोन्ही क्षण दणक्यात साजरे करण्यात आले.