मुंबई काँग्रेस कडून २४ हजार कोटी रु.च्या सात मलजल (सांडपाणी) प्रक्रिया केंद्र उभारणीच्या प्रकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव !
मुंबई काँग्रेस कडून २४ हजार कोटी रु.च्या सात मलजल (सांडपाणी) प्रक्रिया केंद्र उभारणीच्या प्रकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव !
* अमित मिश्रा
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यांच्या आदेशावरून मुंबई काँग्रेसने पालिकेच्या २४ हजार कोटी रु.च्या ७ मलजल (सांडपाणी) प्रक्रिया केंद्र उभारणीच्या प्रकल्पाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकल्पासाठी येणारा खर्च २०१८ मध्ये १० हजार कोटी रु. खर्च येणार होता. हा खर्च २०१६ मध्ये १६ हजार कोटी रु.वर आणि २०२२ मध्ये हा खर्च २४ हजार कोटी रु. वर गेला असल्याचा मुद्दा रवी राजा आणि मुंबई काँग्रेसचे लीगल सेलचे अध्यक्ष तुषार कदम यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मनपा विरोधी पक्षनेते रवी राजा, कोषाध्यक्ष भूषण पाटील, सह कोषाध्यक्ष अतुल बर्वे, लीगल सेलचे अध्यक्ष तुषार कदम यांनी अभ्यास व विचार विनिमय करून मुंबई काँग्रेसतर्फे सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे. सर्व इतर पक्ष व नेते फक्त आरोप करतात मात्र न्यायालयात फक्त मुंबई काँग्रेस गेली आहे. मुंबई काँग्रेस मुंबईकरांच्या हककासाठी कायम लढत आलेली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात मुंबई काँग्रेसने दाखल केलेली याचिका न्यायालयाने स्वीकृत करून त्याची दखल घेत पुढची सुनावणी 15 जून रोजी ठेवण्यात आली आहे.