सुपरस्टार रजनीकांतचा 'लाल सलाम' हिंदीत होणार प्रदर्शित...
सुपरस्टार रजनीकांतचा 'लाल सलाम' हिंदीत होणार प्रदर्शित...
- कार्मिक फिल्म्सचं अभिमानास्पद पाऊल!
* सिने प्रतिनिधि
मागील काही वर्षांपासून दाक्षिणात्य सिनेमे हिंदी भाषिक प्रेक्षकांचे पूर्णपणे मनोरंजन करत आहेत. मूळचे मराठमोळे असलेल्या दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या चित्रपटांची हिंदी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेझ असते. त्यांच्या चित्रपटांची हिंदी प्रेक्षकांना कायम प्रतीक्षा असते. हिंदी रसिकांची हिच आवड ओळखून दक्षिणेकडे गाजलेला 'लाल सलाम' हा तमिळ चित्रपट हिंदीत रिलीज करण्याची घोषणा कार्मिक फिल्म्सने केली आहे. मूळ तमिळ भाषेत बनलेल्या या चित्रपटाने दाक्षिणात्य सिनेरसिकांची मनं जिकत बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवलं आहे. सुपरस्टार रजनीकांत यांची मुख्य भूमिका असलेल्या हिंदी डब 'लाल सलाम'चा २४ मे रोजी प्रीमियर होणार आहे. दक्षिणेप्रमाणेच हिंदी भाषिक प्रेक्षकांच्या मनातही हा चित्रपट आपलं अनोखं स्थान निर्माण करत यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे.
दबंग वृत्तीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या एका व्यक्तीची कथा 'लाल सलाम'मध्ये पाहायला मिळणार आहे. आत्मशोध आणि शौर्याच्या भावनिक प्रवासाद्वारे, तो प्रायश्चित्त करण्याचा मार्ग शोध असतो. त्याला त्या विश्वातून बाहेर काढणाऱ्या लोकांच्या मनात तो आदराचं स्थान निर्माण करतो. अजरामर आणि प्रेरणादायक ठरावी अशी ही आकर्षक कथा प्रायश्चित्त आणि रूपांतरणाची आहे. रजनीकांत यांच्या 'लाल सलाम'ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी केली आहे. तमिळ 'लाल सलाम'ने बॉक्स ऑफिसवर भव्य यश मिळवत प्रेक्षक आणि समीक्षकांकडूनही कौतुकाची थाप मिळवली आहे. आशयघन कथानक आणि रजनीकांत यांचा जबरदस्त अभिनयाच्या बळावर 'लाल सलाम'ने बॉक्स ऑफिसवर नेत्रदीपक यश मिळवलं आहे. यामुळे हा चित्रपट यंदाच्या सर्वाधिक चर्चेतील चित्रपटांपैकी एक बनला आहे. 'लाल सलाम'च्या या अभूतपूर्व यशाचे साक्षीदार होण्याची संधी आता हिंदी सिनेरसिकांनाही मिळणार आहे.
हिंदी भाषिक प्रेक्षकांच्या सांस्कृतिक आवडी-निवडींचे भान राखून कार्मिक फिल्म्सने 'लाल सलाम'चं वितरण काम हाती घेतलं आहे. यामुळे चित्रपटातील प्रेरणादायक संदेश जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. सिने विश्वातील हि एक महत्त्वपूर्ण घटना ठरणार आहे. आजवर आपल्या अनोख्या अभिनय शैलीने असंख्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या रजनीकांत यांचा आजवर कधीही न पाहिलेला अंदाज 'लाल सलाम'मध्ये आहे. 'लाल सलाम'मधील त्यांची भूमिका परिवर्तनकारी आणि प्रेरणादायक असून, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आहे.
दाक्षिणात्य बॉक्स ऑफिसवर आपलं खणखणीत नाणं वाजवणारा हा चित्रपट आता हिंदी भाषिक प्रेक्षकांना एक अनोखा अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे २४ मे २०२४ ही तारीख लक्षात ठेवा, आपल्या प्रियजनांना सांगा, साहस आणि प्रायश्चित्तावर आधारलेल्या नायकाच्या विजयोत्सवी कथेचा अनुभव घेण्यासाठी सिनेमागृहांमध्ये या.
कार्मिक फिल्म्स बद्दल सांगायचं तर हि केवळ मनोरंजनाचे साधन नसून, विचारप्रेरक आणि प्रेरणादायक चित्रपट तयार करण्यासाठी कटिबद्ध असलेली भारतीय चित्रपट उद्योगातील अग्रणी कंपनी आहे. नवनवीन प्रयोग, प्रेरणादायी कथानक आणि दर्जेदार निर्मितीमूल्यांच्या बळावर भारतीय मनोरंजन विश्वाच्या सीमारेक्षा रुंदावण्यात कार्मिक फिल्म्सचं मोलाचं योगदान आहे.