BHARAT JODO : जनजागृती करण्यासाठीच ही भारत जोड़ो यात्रा - भाई जगताप....

BHARAT JODO : जनजागृती करण्यासाठीच ही भारत जोड़ो यात्रा - भाई जगताप....

महागाई, बेरोजगारी, राज्याच्या बाहेर जाणारे उद्योग यांसारख्या जनतेच्या मुद्द्यांवर भाष्य न करता फक्त धार्मिक मुद्यांवर देशातील जनतेमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या या मोदी सरकार विरोधात !

BHARAT JODO : जनजागृती करण्यासाठीच ही भारत जोड़ो यात्रा - भाई जगताप....

* अमित मिश्रा


          बोरिवली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मिर पर्यत सुरु केलेल्या भारत जोडो पदयात्रे ला पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच यात्रेचा विचार आणि संदेश मुंबईतील सर्व विधानसभा मतदारसंघातील नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांमधून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई काँग्रेसतर्फे भारत जोडो पदयात्रा सुरू करण्यात आली आहे.आज बोरिवली विधानसभा क्षेत्रातून ही यात्रा काढण्यात आली होती. 

    या वेळेस बोलताना भाई जगताप म्हणाले की, आज देशामध्ये प्रचंड वाढलेली महागाई आणि बेरोजगारी सारख्या समस्या आहेत. राज्यांमधील व देशामधील उद्योग बाहेर जाऊ लागले आहेत, देशातील जनता त्रस्त झालेली आहे. पण असे असताना सुद्धा या गंभीर मुद्यांवर कोणतेही भाष्य न करता देशातील मोदी सरकार फक्त धार्मिक मुद्यांवर चर्चा करून जनतेमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे. या जनताविरोधी मोदी सरकारविरोधात मुंबईतील जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठीच मुंबईतील 36 विधानसभा क्षेत्रांमध्ये आम्ही ही भारत जोडो यात्रा आम्ही सुरू केलेली आहे. 

    बोरिवली पश्चिम  विधानसभा क्षेत्रामध्ये काढलेल्या या पदयात्रेमध्ये भाई जगताप यांच्या सोबत....

....माजी खासदार संजय निरुपम, माजी मंत्री आमदार अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष भूषण पाटील, मुंबई सचिव राजेश निर्मल,  मुंबई महिला काँग्रेस अध्यक्षा अनिशा बागूल, मुंबई काँग्रेसचे बोरिवली विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे सर्व आजी माजी नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी तसेच मुंबई काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोराई 2 येथून ही पदयात्रा सुरू झाली. तिथून गोराई 1, चिकूवाडी, शिंपोली, करत करत बोरिवली स्टेशन पश्चिम येथे या पदयात्रेचे समापन झाले.