बोरीवलीत 'शब्दसंचित' दिवाळी पहाट...

बोरीवलीत 'शब्दसंचित'  दिवाळी पहाट...

बोरीवलीत 'शब्दसंचित' दिवाळी पहाट...

*अमित मिश्रा

  बोरीवली : अनुबोध  व नवचैतन्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या दिवाळी पहाटेस 'शब्दसंचित' कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.या वर्षी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याचेच औचित्य साधत संत -साहित्य ते सिने - नाटकातील प्रतिभावान कवी गितकारांच्या समर्थ लेखणीच्या परिसस्पर्श झालेल्या एका पेक्षा एक सरस गीतांची स्वरबरसात यंदा बोरीवलीकर गानरसिक अनुभवणार आहेत.
     दि.०१ नोव्हेंबर २०२४ रोजी पहाटे ६:३० वा. बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात सदरहू मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे . प्रसिद्ध गायिका माधुरी करमरकर , श्रीरंग भावे ,सायली महाडिक व अभिषेक तेलंग आपल्या सुरेल आवाजात सुमधुर गीते श्रोत्यांपुठे सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे संगीत संयोजन सुप्रसिद्ध संगीतकार / संगीत  संयोजक कमलेश भडकमकर यांचे असून , आपल्या रसाळ निवेदनातून विविध कवी - गीतकारांचा गानप्रवास,आठवणी व किस्से सादर करतील प्रसिद्ध अभिनेते, निवेदक विघ्नेश जोशी.अशा या सुरेल सुश्राव्य कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी तमाम गानरसिकांनी आवर्जुन उपस्थित रहावे , असे आवाहन , आयोजक भूषण पाटील यांनी केले आहे .