बोरिवली विधानसभा काँग्रेसतर्फे बोरिवली विधानसभा क्षेत्रामध्ये "भारत जोड़ो पदयात्रा"

बोरिवली विधानसभा काँग्रेसतर्फे बोरिवली विधानसभा क्षेत्रामध्ये "भारत जोड़ो पदयात्रा"

  बोरिवली विधानसभा काँग्रेसतर्फे बोरिवली विधानसभा क्षेत्रामध्ये "भारत जोड़ो पदयात्रा"


* अमित मिश्रा


               बोरिवली (मुंबई ) : काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मिर पर्यत सुरु केलेल्या "भारत जोड़ो पदयात्रे" ला पाठिंबा दर्शविण्यासाठी तसेच यात्रेचा विचार आणि संदेश बोरीवली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांपर्यत पोहचविण्यासाठी मुंबई काँग्रेसच्या निर्देशानुसार बोरीवली विधानसभा काँग्रेसच्या वतीने बुधवार, दि. 14 डिसेंम्बर 2022 रोजी दुपारी 3.30 वाजता बोरिवली विधानसभा क्षेत्रामध्ये "भारत जोड़ो पदयात्रा" काढण्यात येणार आहे.
_प्रमुख सहभाग -
श्री भाई जगताप, अध्यक्ष, मुंबई काँग्रेस
श्री संजय निरुपम, माजी खासदार
श्री अस्लम शेख, आमदार व माजी मंत्री, महाराष्ट्र

   तसेच बोरिवली विधानसभा मतदारसंघातील मुंबई काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, ब्लॉक पदाधिकारी, तसेच मुंबई काँग्रेसचे व महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. 
_वार  -  बुधवार 
दिनांक  -  14 डिसेंबर 2022
वेळ  -  दुपारी 4.00 वाजता

  भारत जोडो पदयात्रेचा मार्ग  -  
   माजी नगरसेविका सौ श्वेता कोरगावकर यांचे कार्यालय, गोराई क्र. २, बोरिवली पश्चिम, मुंबई येथून पदयात्रेला सुरुवात होऊन पुढे - प्रगती शाळा - गोराई २ - गोराई १ - कांती पार्क - चिकूवाडी - शिंपोली - गोखले विद्यालय - अंबामाता मंदिर - जांभळी गल्ली करत करत पुढे बोरिवली स्टेशन पश्चिम येथे पदयात्रेचे समापन होणार आहे.