Govinda Naam Mera : कियारा अडवाणीने घेतले मराठी चे धडे ह्या चित्रपटासाठी
Govinda Naam Mera : कियारा अडवाणीने घेतले मराठी चे धडे ह्या चित्रपटासाठी
* प्रतिनिधि
कियारा अडवाणी एक गुणी अभिनेत्री आहे, तिच्या अभिनयाच्या पराक्रमाने तिला केवळ लोकप्रिय भूमिका मिळवण्यातच मदत केली नाही तर ति प्रेक्षकांच्या पसंतीस खरी उतरली आहे. तिची कामगिरी पाहता, तिला जगभरातील तिच्या चाहत्यांकडून खूप कौतुक मिळाले आहे. गोविंदा नाम मेरा मध्ये सुकूचे पात्र साकारणे हे तिच्यासाठी खऱ्या जीवनाच्या विपरीत आहे. एक सामान्य महाराष्ट्रीयन मुलगी, कियाराने सुकूच्या भूमिकेसाठी तयारी करताना कोणतीही कसर सोडली नाही.
या व्यक्तिरेखेमध्ये येण्याच्या तिच्या तयारीबद्दल बोलताना कियारा अडवाणी म्हणते, "सुकू हे माझ्यासाठी पडद्यावर साकारण्यासाठी खूप नवीन पात्र आहे आणि मी यापूर्वी केलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा वेगळे आहे. तिची चालण्याची आणि बोलण्याची एक खास पद्धत आहे. सुकू खूप वेगाने बोलते, ती मराठी मुलगी आहे म्हणून मला काही विशिष्ट शब्द, भाषेची शिकाव लागलं तसेच ती स्टेज डान्सर देखील आहे, त्यामुळे तिची एक विशिष्ट देहबोली आहे. सुकूची बसण्याची, चालण्याची पद्धत खूप आगळी वेगळी आहे. हे छोटे तपशील सुकूच्या व्यक्तिरेखेमध्ये येणे खूप महत्त्वाचे आहे आणि मला मार्गदर्शन करण्यासाठी शशांक होता. मला मनापासून धन्यवाद द्यावे लागतील, त्यांनी माझ्यासाठी बोली प्रशिक्षक आणि मराठी प्रशिक्षक देखील बोलावले."
गोविंदा नाम मेरा, व्हायकॉम18 स्टुडिओ आणि धर्मा प्रॉडक्शन यांनी संयुक्तपणे निर्मित केला आहे. पूर्णपणे नवीन अवतारात बॉलीवूड स्टार विकी कौशल दाखवत, संपूर्ण कौटुंबिक मनोरंजन शशांक खेतान यांनी लिहिले आणि दिग्दर्शित केले आहे आणि हिरू यश जोहर, करण जोहर, अपूर्व मेहता आणि शशांक खेतान यांनी निर्मीत आहे. तसेच भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणी अभिनीत,16 डिसेंबर रोजी डिस्ने+हॉटस्टारवर खास रिलीज होईल.