नॅशनल आइस्‍क्रीम डे निमित्त एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकारांनी सांगितले त्‍यांच्‍या शहरांमधील त्‍यांच्‍या आवडत्‍या फ्लेवर्सबाबत 

नॅशनल आइस्‍क्रीम डे निमित्त एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकारांनी सांगितले त्‍यांच्‍या शहरांमधील त्‍यांच्‍या आवडत्‍या फ्लेवर्सबाबत 

नॅशनल आइस्‍क्रीम डे निमित्त एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकारांनी सांगितले त्‍यांच्‍या शहरांमधील त्‍यांच्‍या आवडत्‍या फ्लेवर्सबाबत 

* प्रतिनिधी


     निश्चितच आइस्‍क्रीम सर्वांना आवडते. प्रत्‍येकाच्‍या आइस्‍क्रीमशी संबंधित बालपणीच्‍या गोड आठवणी आहेत. उन्‍हाळा असो वा हिवाळा आवडत्‍या आइस्‍क्रीम फ्लेवरचा स्‍कूप कंटाळवाणा दिवस उत्‍साहित करतो. नॅशनल आइस्‍क्रीम डे निमित्त एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकार त्‍यांच्‍या मूळगावामधील त्‍यांच्‍या आवडत्‍या आइस्‍क्रीम फ्लेवर्सबाबत सांगत आहेत. हे कलाकार आहेत मौली गांगुली (महासती अनुसूया, 'बाल शिव'), कामना पाठक (राजेश सिंग, 'हप्‍पू की उलटन पलटन') आणि विदिशा श्रीवास्‍तव (अनिता भाभी, 'भाबीजी घर पर है').

     एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'बाल शिव'मधील मौली गांगुली ऊर्फ महासती अनुसूया म्‍हणाल्‍या, ''आइस्‍क्रीम पार्श्‍वभूमीमध्‍ये किंवा कधी-कधी अनेक आनंदी आठवणी घेऊन येते. कोलकातामधील सर्वांना 'नोलन गुर' आइस्‍क्रीम आवडतो, जे क्रीमी असण्‍यासोबत बंगालमधील प्रसिद्ध खास हिवाळी गुळाच्‍या चवीसारखे आहे. मझेर आणि मला बंगाली स्‍पेशल 'गोंधाराज' खूप आवडते. हे हलक्या लिमोन्‍सेलो सारखे आहे, ज्‍यामध्‍ये काफीर स्‍वाद आहे आणि ते कोलकाताच्‍या गोंधाराज लेमन पॅक्‍ससारखे आहे. मला आइस्‍क्रीम खूपच आवडते आणि मी नेहमी व्हॅनिला आणि चोको चिप्सला प्राधान्य देते.''

     एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मधील कामना पाठक ऊर्फ राजेश म्‍हणाल्‍या, ''आइस्‍क्रीम हे एकमेव डिसर्ट आहे, जे मला आनंदीत करू शकते, ते मला परमानंद देते. इंदौर गुलाबजामुन ते रस मलाई अशा पारंपारिक भारतीय मिठाईंसाठी प्रसिद्ध आहे. इंदौरमधील आइस्‍क्रीमचा अद्वितीय फ्लेवर मिळवण्‍याचे तरूणांसाठी प्रख्‍यात हब टॉप एन टाऊनने गुलाबजामुन व व्‍हॅनिला आइस्‍क्रीमचे स्‍वादिष्‍ट संयोजन सादर केले. हे आइस्‍क्रीम गरम व थंडची जुगलबंदी आहे, जे मला खूप आवडले. आज अशा फ्लेवर्सचा विचार करताच माझ्या तोंडाला पाणी सुटते. इंदौरमध्‍ये गेल्‍यास या आइस्‍क्रीमचा आस्‍वाद घेतलाच पाहिजे.''

    एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'भाबीजी घर पर है'मधील विदिशा श्रीवास्‍तव ऊर्फ अनिता भाभी म्‍हणाल्‍या, ''भारतीयांना बनारसी आइस्‍क्रीमचा विशिष्‍ट स्‍वाद व पोत आवडतो, जे अत्‍यंत लोकप्रिय आहे. बनारसी कुल्‍फी मला खूप आवडते आणि माझा आवडता फ्लेवर केसर आहे. ते पाश्चिमात्‍य पाककलांप्रमाणे अत्‍यंत स्‍वादिष्‍ट व क्रीमी आहे. माझ्या मूळगावी गोड पातळ वर्मीसेली नूडल 'फालूदा' सर्व्‍ह केला जातो. फालूदा व कुल्‍फी हे प्रादेशिक आइस्‍क्रीम आहेत. प्रत्‍येकजण वाराणसी घाटांवर त्‍यांचा आस्‍वाद घेतात. मला दररोज माझ्या आवडत्‍या कुल्‍फींचा आस्‍वाद घ्‍यावासा वाटतो, पण मनात कॅलरी वाढण्‍याचा विचार येतो (हसतात).''     
- पहा 'बाल शिव' रात्री ८ वाजता,'हप्‍पू की उलटन पलटन' रात्री १० वाजता आणि 'भाबीजी घर पर है' रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!